वारंवार विचारले जाणारे प्रश्न

नगरविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी महा-युएलबी ही महत्वकांक्षी योजना सुरू केली आहे. सदर योजना ही माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानाचा वापर करून महानगरपालीका, नगरपरिषद व नगरपंचायती मार्फत सर्व सेवांचा ऑनलाईन लाभ नागरिकांपर्यंत थेट पोहचवत आहे. तसेच या योजनेंतर्गत महानगरपालीका, नगरपरिषद व नगरपंचायतींमधील सर्व विभागांचे संगणकीकरण करण्याचे योजीले आहे.

खाली नमुद केलेलेल्या लिंक चा वापर करून आपण महा-युएलबी चा वापर करू शकेल http://103.249.96.239:5050/MahaULBTestEnv/index

महा-युएलबी प्रणाली ही नागारीक, नगरविकास विभागातील अधिकारी, नगरपरिषद संचालनालय आणि नगरपरिषद मधील अधिकारी व कर्मचारी वापर करू शकतो.

महा-युएलबी प्रणाणी १०२४*७६८ या मॉनिटर रिसोल्युशन मध्ये आणि मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोर ९+, मोझील्ला फारफोक्स, क्रोम २३ आणि सफारी ५.१.७ यावरील सर्व ब्राऊझर्स मध्ये वापर करता येईल. या व्यतिरिक्त इतर काही ब्राऊझर्स मध्ये महायुएलबीचा वापरा करता येईल परंतु महायुएलबी प्रणाली व्यवस्थितरित्या कार्यान्व्ती होईल याविषयी आम्ही आपणांस कोणत्याही प्रकारची हमी देऊ शकत नाही.

हो, महा युएलबी पूर्ण पणे सुरक्षीत आहे. सदर वेबसाईट ही TRUSTe वेब सर्व्हर सर्टीफिकेट याद्वारे सुरक्षीत केलेली आहे. यावर होणारे सर्व व्यवहार हे २५६ बीट पर्यंत सिक्युअर सॉकेट लेयर एनक्रिप्शन केलेले आहेत.

विविध नागरी सेवांसाठी खालीलपैकी कोणत्याही एक पद्धतीने भरणा करता येईल.
(ए) रोख कार्ड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंगचा उपयोग करून ऑनलाइन पैसे भरणे.
(ब) आपल्या संबंधित नगरपरिषदेच्या नागरी सुविधा केंद्रात (सीएफसी) रोख, धनादेश आणि धनाकर्ष द्वारे पैसे भरू शकता.

पोर्टल २ भाषांमध्ये उपलब्ध आहे: १. मराठी २. इंग्रजी. सर्व ऑनलाइन सेवा या एकावेळेस एका भाषेतून वापरता येतात.

पोर्टलवरील नागरिकांनी खाली दिलेल्या पर्यायांमधून ऑनलाइन सेवांचा लाभ घेता येईल.
पर्याय १: ऑनलाइन सेवा मिळविण्यासाठी, नागरिक स्वतः पोर्टलवर नोंदणी करू शकतात. यशस्वी नोंदणी झाल्यावर, नागरिकांना त्यांचे युजर आयडी आणि पासवर्ड वापरुन पोर्टलमध्ये लॉग इन करणे आवश्यक आहे. एकदा लॉग इन केले की, नागरिक नागरिक सेवा मेनूमधून इच्छित सेवा निवडू शकतात.
पर्याय २: नागरिक वेब पोर्टलवरुन लॉग-इन न करता थेट सर्व ऑनलाइन सेवांचा लाभ घेऊ शकतात.

होय, नागरिकांना त्यांच्या प्रोफाइल आणि सेवेचा लाभ घेण्यासाठी आणि त्यांची संबंधित माहिती पाहण्या / सुधा���ण्यासाठी त्यांच्या स्वत: च्या वैयक्तिक युजर आयडीची आवश्यकता आहे

सर्व नागरी संबंधित सेवा आणि नोंदणी न करता खालील माहितीचा लाभ घेता येईल: शहर माहिती - ओळख, तथ्य पत्रक, पर्यटन माहिती, फोटो गॅलरी संस्थेचे तपशील - महापालिकेचे आयुक्त, महापौर, उपमहापौर, प्रशासकीय मंडळ, निर्वाचित सदस्य, विभाग, नागरी सनद, सुरु असलेले आणि पूर्ण केलेले प्रकल्प नियम, कायदे आणि उपविधी, सार्वजनिक सूचना, अर्ज स्थिती इ.

आपण आपल्या संबधीत युएलबीच्या पोर्टलवरून "आमच्याशी संपर्क साधा" या पर्यायाचा वापरकरून आपण आपल्या शंका आम्हाला पाठवू शकता.

एसएमएस / ई-मेलद्वारे प्रतिसाद मिळविण्यासाठी आपल्याला पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. नागरिक पोर्टलमध्ये प्रवेश केल्यानंतर डॅशबोर्डवर अर्ज करण्याची स्थिती पाहू शकतात. याशिवाय नागरीकांनी एसएमएसच्या / ई-मेलद्वारे किंवा दोन्हीद्वारे सेवेच्या प्रगतीबद्दल माहिती दिली असेल तर, यूएलबी एसएमएस / ई-मेलद्वारे किंवा दोन्हीद्वारे आवश्यक प्रगती प्रदान करेल. वरील सर्व MAHULB पोर्टलमध्ये ऑनलाइन सेवांच्या प्रगतीचा आढावा घेण्याची सोय देखील आहे.

महा-युएलबी मार्फत आपल्या वैयक्तिक माहितीची आवश्यकता फक्त आपल्याशी संवाद आणि ओळख याच उद्देश्यासाठी घेतली जात आहे. त्या व्यतिरीक्त महायुएलबी कोणत्याही इतर कारणांसाठी कोणत्याही वैयक्तिक माहितीचा वापर करणार नाही आपली सर्व वैयक्तिक माहिती महायुएलबी वर सुरक्षित राहील आणि आपल्या लेखी परवानगीशिवाय उघड केली जाणार नाही. कृपया महायुएलबी पोर्टलवर अधिक माहितीसाठी अटी व शर्ती पहा.

अर्जाचा फॉर्म ऑनलाईन सादर करताना अर्जदाराला आवश्यक स्कॅनिंग कागदपत्रे जोडता येतील. तथापि, सेवेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले सर्व आवश्यक दस्तऐवज युएलबी काउंटरवर मूळ स्वरूपात सत्यापित करणे आवश्यक आहे.

महा-युएलबी च्या लँडिंग पेजवर आपण आपल्या सेवेची स्थिती "आपल्या सेवेची स्थिती जाणून घ्या घ्या" या सुविधेद्वारे आपण आपल्या सेवेची स्थिती तपासू शकता. वरील सर्व नागरीकांना महा-युएलबी पोर्टलवर केंद्रस्थानी आपली सेवा स्थिती कळू शकेल.

होय, महा युएलबी, महाराष्ट्र त्यांच्या स्वत: च्या मोबाइल अॅवप आहे या अॅापद्वारे नागरीक निवडक सेवांचा लाभ घेऊ शकतात जसे की आपल्या मालमत्तांची देयके भरणे , दुय्यम परवाना इत्यादी.